फाटक्या माणसाची भटकंती. येथे हे वाचायला मिळाले:

१७ ऑगस्ट २००९, आज आमचा लेह मधला शेवटचा दिवस. मस्त ४ दिवस लेह मध्ये मज्जा केली, ती जागा आता  सोडून आम्ही परतीच्या प्रवासाला निघणार होतो.  काल जरा थकायला झाले होते, म्हणून सकाळी ७ वाजता सर्व उठलो आणि सर्व आवरून आप-आपले सामान घेऊन बाहेर आलो. मस्त नाश्ता चालला होता, एवढ्यात ऐश्वर्या बोलली चीझचा  डबा  कुठे गेला. आमची इकडे तिकडे शोधा-शोध चाललेली पाहून नबीची बायको बोलली “क्या  धुंड रहे हो तुम”. मी तिला हाताने चौकोनी असे दाखवत होतो आणि तोंडाने  त्रिकोनी डबा  असे बोलत होतो, वास्तविक तो  डबा चौकोनीच होता. सर्व माझ्या वर हसायला लागले आणि रोहन बोलला ...
पुढे वाचा. : लेह बाईक ट्रीप - दहावा दिवस (लेह ते त्सो-मोरिरी)