शिवाजी पार्कला सेनापती बापटांच्या पुतळ्याकडे 'क्विक सर्विस लाँड्री' होती. बरोब्बर त्यासमोर आमचा किरण म्हणून एक मित्र अजूनही राहातो. एकदां मला दुसऱ्या एका मित्रानें त्याच्या घराखालून हांक मारायला सांगितली. मीं हांक मारतांच सगळे पळून गेले. मंतर किरणनें मला वर बोलावून सांगितलें कीं समोर किरण नांवाची एक गुजराती तरुणी राहाते. आणि हांक मारली कीं तिचे वडील, दोन भाऊ वगैरे जे घरीं असतील ते गॅलरीत येऊन उभे राहातात. तुला बकरा बनवला तें त्यांच्या लक्षांत आलें म्हणून. नाहीं तर तुला ठोकून काढला असता. पुन्हां अशी हांक मारूं नको.

सुधीर कांदळकर