तुमचे शब्द जवळ जवळ सर्वच धर्मांच्या बाबतीत असलेल्या परिस्थितीचे विदारक चित्र दाखविणारे आहेत. काशीतील रामाच्या मंदिरात मी हाताने झारीतील तीर्थ घेत असताना तिथला पुजारी भडकून अंगावर धावून आला होता. मी तीर्थ न घेताच त्या मंदिरातून बाहेर पडलो होतो. आई-वडिलांना घेऊन तिरुपतीला गेलो होतो (पंचवीस वर्षांपूर्वी! ). तिथल्या मंदिर-आवारातील देवडीत देवाच्या मूर्ती असतील, असे समजून आई तिकडे दर्शनासाठी जाऊ लागली तेव्हाही तिथले सटर-फटर सेवक-पुजारी तमिळमध्ये आरडा-ओरडा करीत आईला हाकलून देण्यासाठी धावले होते; आजच्या सारखी गर्दी तेव्हा तिथे नव्हती तरीही! त्या पुजाऱ्यांना समजावून सांगितले तेव्हा त्यांनी त्या देवड्या म्हणजे मंदिरे नव्हेत, हे सांगितले. दर्ग्यांमध्ये मात्र असा विचित्र अनुभव आला नाही. पण मूळ धर्माची शकले झाल्यानंतर त्या त्या धर्माच्या अनुयायांना क्लेषदायक परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहेच. साईबाबांना सोन्याचे सिंहासन! आज अशी परिस्थिती अशी आहे की, मी लांबूनच मंदिराच्या कळसाचे दर्शन घेतो आणि परततो. देवाला कोंडणाऱ्या पुजाऱ्यांवर सरकारने नियंत्रण आणायचे म्हटले की मात्र गदारोळ होतो. हृदयातला देव जागा करून त्याचे दर्शन घेणे जमावयास हवे.