मॅंडेटमध्ये कुठल्याही मुळाक्षराचे द्वित्त होत नाही.  पण जेव्हाजेव्हा इंग्रजीत द्वित्त दिसते तेव्हातेव्हा त्या जोडाक्षराचा कधीही जोड‌उच्‍चार होत नाही. द्वित्तीकरण फक्त विकृत उच्‍चार टाळण्यासाठी असते. कटिंगमधला डबल टी काढून एकच टी ठेवला तर शब्दाचा उच्‍चार क्यूटिंग होईल;  ऑकेजनमध्ये एक एस् वाढवला तर उच्‍चार ऑकॅशन होईल,  तसे न करता फक्त एक सी कमी केला तर ओकेजन. केवळ म्हणूनच, ऑकेजनमध्ये दोन सी पण एकच एस्. याच कारणासाठी , ब्रिटिश ट्रॅव्हेलिंगमध्ये डबल एल् असतो, एकच असता तर उच्‍चार ट्रॅव्हीलिंग झाला असता. (अमेरिकनांना हे समजत नाही!  त्यांनी काही विचार न करता एक एल् काढून टाकला.)

कन्‍नड(=तेलुगू), तमीळ आणि मलयाळम या लिप्यांत ऱ्हस्व-दीर्घ ए आणि ओ असतात. ऐ आणि औ नाहीत. या चारही भाषांत द्वित्ते भरपूर. त्यांची बोलणी ऐकताना तारायंत्राचा कट्ट कडकट्ट असा आवाज चालू असल्यासारखे वाटल्यास आश्चर्य नाही.

Their : उच्‍चार  व्यंजनाअगोदर देअऽ, स्वराअगोदर कधीकधी  दअर्.  देअऽ बुक् आणि क्वचित दअर् ऍक्ट्.
There : तीन उच्‍चार. एरवी  देअऽ. क्वचित द‌अऽ. आणि स्वराआधी चक्क द्र. द्‌र ईज् अ मॅन स्टॅन्डिंग फ़ॉरऽ अ लाँग टाइम्.
मराठी माणसाने हे असले उच्‍चरणातले सूक्ष्म भेद करायची गरज नाही. आपण ठणठणीत दोन्ही शब्दांचे देअर असेच उच्‍चार करावेत, म्हणजे भारतीय माणसाला अर्थ नीट समजेल.