शीखांत स्त्री-पुरुषांची बहुतेक नावे सारखीच असतात. नांवाला सिंग जोडले की तो पुरुष आहे असे समजावे आणि कौर जोडले की स्त्री. सोनलसिंग म्हणजे मित्र आणि सोनलकौर म्हणजे मैत्रीण. गुजराथीत भाई जोडले की पुरुष आणि बेन जोडले की स्त्री. मराठीत राव-पंत-भाऊ किंवा बाई-ताई-अक्का नाही लावले तरी माणसाच्या जातीचा बोध होतो.
राजकारणात हे चालत नाही. सगळेच आणि सगळ्याच माँ असतात आणि जीदेखील. एखादी अगदी तरुण लग्न न झालेली सरपंच असली तरी ती मा. लताजी(म्हणजे एकाचवेळी आई आणि आजी) असते.