माझे शब्द,

तुमचे म्हणणे खरे मानले तरीही,
मंदिरातला का होईना पण,
जैन धर्म काय आहे हे मला जाणून घ्यायला आवडेल.

शत्रुवर विजय मिळवणाऱ्यांना, विशेष सिद्धी प्राप्त करणाऱ्यांना, अध्यापकांना व धर्म पंडितांना
नमस्कार करावा हे मान्य होण्यासारखेच आहे.

अहिंसा पाळावी हेही तत्त्व समजले.

मात्र दिगंबर, श्वेतांबर व तेरा पंथीयांमधला भेदभाव समजला नाही.
त्यांच्यात कुठली साम्ये आहेत आणि काय फरक आहेत?

२४ तीर्थंकरांच्यानंतर जैन धर्मास राजाश्रय का मिळू शकला नाही?

या सगळ्यांचीही यथाशक्य चर्चा करावी ही विनंती!