(आता तुम्ही) इतकंSSS लिहीलं आहे की आमच्या सारख्यांना काही लिहायला "जागाच" (स्पेस/स्कोप) नाही राहिली...!
- अहो, मी प्रतिसादाच्या जागेवर कुठे एवढा मोठा लेख लिहिला आहे... की तुम्हाला काही जागाच राहू नये! :) प्रतिसादाची जागा तर रिकामीच होती की... :) आणि तसं पाहिलं तर हा लेख मोठा नाहीच्चाय!!! ('नाहीच्चाय' ही कविवर्य अरुण कोलटकरांची 'ष्टाईल' हां. मला जाम आवडते. )
( एका प्रामणिक प्रतिसादाची अशी चेष्टा करणं वाईटच...
- नाही हो! तुमचा प्रतिसाद प्रामाणिक आहे / तसा तो मला वाटला म्हणून तर मी त्याची दखल घेतली... अन्यथा उत्तरच दिले नसते... म्हटलं, तुमच्याच 'ष्टायली'त आपणही जराशी गंमत करावी, इतकंच. वाईट वाटलं असेल तर जाहीर माफी मागतो. क्षमा करावी.
हे ३ 'S' लिहिण्यासाठी लिहावं लागलं हो..! )
- आता याला काय म्हणावे बरे? माझी चेष्टा की अन्य काही? :)
- प्रदीप कुलकर्णी