गोदागौरव कविता त्यावेळी आमच्या पाठ्यपुस्तकात होती आणि ती संपूर्ण पाठ म्हणण्यात मोठी धन्यता वाटे.
- वा... वा...
ही कविता ज्यांना पाठ्यपुस्तकात होती, ते धन्यच होते म्हणायचे. मी ही कविता प्रथम वाचली ती जुन्या कवितांच्या कुठल्या तरी संकलनात. फार छान, लयदार कविता आहे ही. जणू काही गोदावरीच वळणे-वळसे घेत संथपणे, मंदपणे वाहत वाहत पुढे पुढे निघाली आहे...! गोदावरीची सगळी लय या कवितेत उतरल्याचे जाणवते! पण दुर्दैव असे की, मलाही या कवितेच्या अधल्यामधल्या ओळीच आठवतात. विशिष्ट जाणिवेने कविता वाचण्याचे माझे ते त्या वेळचे वयच नसावे! कविता तशी खूपच मोठी आहे ही... सगळीच्या सगळी लक्षात राहणे तेव्हाही शक्य नव्हते... पण साधारणपणे कुणी सुरुवातीच्या शब्दाचा 'ढकलस्टार्ट' दिला की माहीत असलेल्या, एकदा वाचलेल्या कवितेच्या पुढील ओळी मला आपोआपच आठवतात... पण या कवितेबाबत काही ते होत नाही... असो. या कवितेच्या शोधात मी आहेच... मिळाली की इथे सादर करीन.
आता मात्र त्यातल्या दोन ओळीच आठवतात
तुझ्या प्रवाही कुंकुमवाही बालरवी जणू उदय करी
जय संजीवनी जननी पयोदे श्रीगोदे भवताप हरी
- वा... वा...
यातली दुसरी ओळ मात्र माझ्या स्मरणात लख्ख आहे.
पहिली विसरून गेलो होतो.
तशीच जिऊ या नावाची त्यांची कविताही पाठ्यपुस्तकात होती.
- अच्छा. ही कविता आई आणि मुलगी यांच्या नात्यासंबंधीची आहे का?