चंद्रशेखर म्हटले की 'गोदागौरव' आणि 'काय हो चमत्कार' ही दोन दीर्घकाव्ये डोळ्यापुढे आल्यशिवाय राहणे शक्य नाही.
पाठ्यपुस्तकांतून केव्हा ना केव्हा यांतले उतारे अभ्यासाला असायचेच.
मजभवती जो अजगर ऐसा गाढ निजेला अचल दिसे
.... पूर्वी हाच असह्य असे
(सह्याद्रीचे वर्णन)
अशी काहीतरी 'गोदागौरवा'ची सुरवात असावी
'काय हो चमत्कार' हे गोष्टीरूप काव्य आहे. धनी शेतकऱ्याच्या मुलीचे नोकरमाणसावर प्रेम बसते. पण लग्न होऊ शकत नाही. ती दुसऱ्या गावी जाते. मध्ये तिला परत आणायला तो नोकर जातो. येत असताना थंडी वाजल्यामुळे ती त्याला आपली शाल देते. घरी आल्यावर ती जेव्हा कथा वडिलांना सांगते तेव्हा वडील घाबरतात. कारण तो नोकर आधीच कधीतरी मेलेला असतो. शेवटी त्याच्या अंत्यसंस्काराच्या जागी गेल्यावर ती शाल त्यांना तेथे सापडते. ... अशी काहीशी लांबलचक भूतकथा आहे (मी अजिबात वाचलेली नाही. कुणाकडून तरी ऐकलेली आहे. तपशीलात बरेच फरक असतील उदा. शाल की चोळी असे. चू. भू. द्या. घ्या.)
अभ्यासाला यातला फक्त सुरवातीचा भाग असतो. शेतकरी (धनाजी), त्याची बायको (राजाऊ) आणि मुलगी (जिऊ) यांची वर्णने. आर्यावृत्तात सर्व रचना आहे. यमके चांगली जमवलेली आहेत. गुणगुणायला मजा येते. शाळेत असताना माझी सगळी पाठ होती . आता बरीचशी विसरलो.
पूर्वी एक धनाजी म्हणूनि कुणबी वसे अशा गावी
गावी कीर्ति तयाची गावकऱ्यांनी दुज्यास सांगावी ... अशी काहीशी सुरवात असल्याचे अंधुकसे आठवते.
(जिऊचे वर्णन)...
ती दोघे असुनी ... असे त्यांस दूसरा जीव
कन्या जिऊ म्हणोनी तत्प्रेमालय रसाल राजीव
...
(ही कन्या जवळ जवळ सर्वगुणसंपन्न असल्याचे वर्णन पुढे येते)
रूप --
गोधूम वर्ण तीचा हरणाच्या पाडसापरी डोळे
स्नेहाळ वदन नामी प्रसन्न विधुबिंब जेवि वाटोळे
तो केशपाश काळा भाळावर लांब आडवे कुंकू
जणु म्हणति शब्द तीचे आम्ही कोकिलरवासही जिंकू
....
येता सुदिन सणाचा पुतळ्यांची माळ ती गळां घाली
तेव्हा शृंगाराच्या माहित नव्हत्या नव्या तऱ्हा चाली
---
गुण --
ती रूपवती जितकी .... गुणवतीहि ती तितकी
बहुधा रूपगुणांचे व्यस्तचि दिसते प्रमाण मूर्तित की!
.....
....... करी झराझर कशा पुरणपोळ्या
---
लावून गुळवणी वा पुरण करी सार ती मजेदार
ऐसी की जे सेवुनि हुशार व्हावा मनुष्य बेजार
....
....
अशी काहीशी कविता आहे
चू. भू. द्या घ्या.