बेडगी किंवा ब्याडगी ही कर्नाटकातली मिरची, काश्मीरची नाही.  बेडगी लालभडक पण बेताची तिखट असते हे मात्र बरोबर. निपाणीची संकेश्वरी अतितिखट;  गुंटूर आंध्र प्रदेशातली,बेडगीच्या मानाने सडपातळ  पण जास्त तिखट. काश्मिरी मिरची रंगाने नारिंगी-तांबडी, पदार्थाला छान रंग आणते पण  कमी तिखट. उरली ती हुबळीची रेशीमपट्टी. सिमला मिरचीसारखी जाडजूड आणि अगदी कमी तिखट. पण या सर्व मिरच्या मेक्सिकेतल्या मिरच्यांपेक्षा कमीच तिखट.--अद्वैतुल्लाखान