पण खरं सांगू का? जुनकट-पिवळट पानांच्या पुस्तकातून या कवितेची गाठ पडली असती, तर जी काही मौज आली असती, ती काही न्यारीच ठरली असती :)... पण असो, आता आंतरजालीय युग असल्यामुळे (आणि आपण सगळेच त्याचा मनःपूत लाभही घेत असल्यामुळे) ही अपेक्षा आजच्या काळात तशी अवाजवीच म्हणायला हवी.
असे असले तरी 'गोदागौरव' शोधण्यासाठी तुम्ही घेतलेल्या आंतरजालीय परिश्रमांबद्दल तुमचे मनापासून आभार.