प्राण्याला होणारे विविध आनंद हे उत्क्रांती/जगणे/वीण वाढवणे या साठी आवश्यक क्रीयांमध्ये कोठेतरी दडलेले असतात.
जसे - खूप चविष्ट पदार्थ खाण्याने होणारा आनंद हा मुळात 'खाणे हे जगण्यासाठी आवश्यक' असल्यामुळे होत असतो. जेवढी गोष्ट अधिक चविष्ट, तेवढा त्याचा शरीराच्या भरण पोषणास अधिक उपयोग. या मुळात चविष्ट पदार्थ आवडण्याच्या प्रेरणेचा विकास होत होत आजची पाककला निर्माण झालेली आहे.
संगीत ही सुद्धा अशीच एक 'गरज' आहे. मनुष्य समाज करून रहायला लागल्यावर अनेक कला उदयास आल्या त्या टोळीची आवश्यकता म्हणून. एकमेकांना संदेश देण्याच्या आवश्यकतेतून चित्रकला, संगीत आणि नृत्य जन्माला आले. त्याच पायावर अधिक विस्तारित अशी संगीताची इमारत उभी आहे. जगण्याला कुठेतरी मूलतः आवश्यक असल्यानेच ते (संगीत) आनंददायीही आहे. हा दुवा पहा, संगीत आणि जगण्याची मूळ प्रेरणा यांचा संबंध अगदी छान समजावून सांगितलेला आहे.