उदाहरणार्थ, रामहा(रामौ रामाहा) मध्ये रामः चा उच्‍चार 'म'वर खटका देऊन करता येईल, पण रामाः मध्ये खटका कसा देता येईल? त्याचा उच्‍चार रामाहा असा करावा लागतो अशी माझी समजूत आहे.  तसाच सुरैः चा सुरैहि‌‌.(चूभूद्याघ्या).
विसर्गापुढील अक्षरानुसार त्याचा अवग्रह, र्, श्, ष्, स् इ. होऊन उच्चारण सोपे होऊन जाते. --अर्थात, जर पुढील अक्षर क-ख-प-फ यांतले एक नसेल तर. (नमस्कार-आविष्कार वगैरे अपवाद आहेत. )
गुणत्रयातीता, कालत्रयातीता, तृप्यंतू, तुष्टिरस्तू, नमामी, वदामी  हे मात्र ऐकू येते.
मराठीत खछठथफ या अक्षरांचे द्वित्त होऊन आलेले शब्द ऐकू येतात, संस्कृतमध्ये येत नाहीत.  मराठीतले शब्द : लख्ख, लछ्‌छी, लठ्ठ, जथ्था, लफ्फा वगैरे. परंतु घझढधभ यांची द्वित्ते मराठीत सापडत नाहीत.  पंजाबीत-गुजराथीत दिसतात. चढ्ढा, लढ्ढा, शुध्ध वगैरे. त्यांचा उच्‍चार करणे त्यांना खरोखर जमते की नाही ते पहायला पाहिजे.
>'जय हे महिषासुरमर्दिनि रम्य कपर्दिनि शैलसुते' या अत्यंत श्रुतिमधुर स्तोत्राची घनपाठींकडून वाट लागताना  ऐकलेले आहे.< -  हा अनुभव नाही. मला असे घनपाठी अजून भेटलेले नाहीत.
बाकी ग्रामीण मराठीतले मराठीतले फुडे वगैरेचे अनुभव आहेत.
मराठीतली ह असलेली अक्षरे उच्‍चारताना थोडी गडबड होतेच. पाहणे-राहणे चे पहाणे-रहाणे होणे, पोह चे पोहो होणे, बादशाह चे बादशहा होणे हे  अगदी सामान्य. हिंदीत मात्र आवर्जून बादशाह असा उच्‍चार करतात.