उदाहरणार्थ, रामहा(रामौ रामाहा) मध्ये रामः चा
उच्चार 'म'वर खटका देऊन करता येईल, पण रामाः मध्ये खटका कसा देता
येईल? त्याचा उच्चार रामाहा असा करावा लागतो अशी माझी समजूत आहे. तसाच
सुरैः चा सुरैहि.(चूभूद्याघ्या).
विसर्गापुढील अक्षरानुसार त्याचा
अवग्रह, र्, श्, ष्, स् इ. होऊन उच्चारण
सोपे होऊन जाते. --अर्थात, जर पुढील अक्षर क-ख-प-फ यांतले एक नसेल तर.
(नमस्कार-आविष्कार वगैरे अपवाद आहेत. )
हे खटक्याबिटक्याचे काही कळले नाही. माझ्या माहितीप्रमाणे संस्कृतात विसर्गाचा उच्चार 'ह्'सारखा व्हावा. म्हणजे रामः = रामह्, रामाः = रामाह्, कविः = कविह्, तरुः=तरुह्, रामैः = रामैह् वगैरे. निदान मी असे ऐकलेले आहे. ('बाबा वाक्यं प्रमाणम्'.) याबद्दल काही टिप्पणी करू शकाल काय?