इतर व्यक्ती उदा. आईन्स्टाईन, जीजस आणि अजून कोण ते.. ते काय संगीतज्ज्ञ होते का?
मग त्यांच्या, अर्थाअर्थी संगीताशी संबंध नसलेल्या विधानांना 'ह्या सगळ्या विधानांचा एकत्रित अर्थ संगीत' असे काहीच्या काही लिहून,
तुम्ही काय ते बरोबर, आणि माधव गाडगीळ वगैरे इतर चूक? ह्याला काय अर्थ आहे? बरं माझ्या मते मंदारने तुम्ही लिहिलंय ते चूक आणि माधव गाडगीळ बरोबर अशा अर्थाने तो दुवा दिलेला नसावा. असो.

तुम्ही शास्त्रीय संगीत आणि बँड ह्यांची तुलना केलीये.
बँडवाले जरी शास्त्रीय संगीत शिकलेले नसले, तरीही, ते कुणाकडूनतरी शिकतात, त्यावर रियाज करतात आणि म्हणून ते तसे वाजवू शकतात.
शास्त्रीय संगीत शिकलेल्या एका माणसाला फिल्मी गाणी वाजवता आली नाहीत म्हणून सगळ्यांना ते जमणार नाही असे नाही.
उलट-पक्षी, बँडवाल्याला एखादा राग वाजव म्हटलं, तर त्याला ते जमेल का?
सबब- ही तुलना अतिशय एकांगी आहे.

> जे तुम्हाला करायचं आहे त्याचं स्मरण आणि शारिरिक क्रिया यांच्यात समयशून्यता हवी.  त्यामुळे कोणत्याही वादनात तुम्हाला जे >वाजवायचं ते पूर्णपणे स्मरणात हवं. आणि मग त्या स्मरणाबरहुकूम वाजवणं हा रियाज आहे.

जे वाजवायचं ते पूर्णपणे स्मरणात राहण्यासाठी जे करतात तो रियाज. स्मरणाबरहुकूम वाजवणं म्हणजे रियाज ही व्याख्या पटत नाही.स्मरण आणि शारिरिक क्रिया ह्यांच्यात समयशून्यता हवी हे पटलं.

- चैतन्य.