१) ..."इतर व्यक्ती उदा. आईन्स्टाईन, जीजस आणि अजून कोण ते.. ते काय संगीतज्ज्ञ होते का?मग त्यांच्या, अर्थाअर्थी संगीताशी संबंध नसलेल्या विधानांना 'ह्या सगळ्या विधानांचा एकत्रित अर्थ संगीत' असे काहीच्या काही लिहून,तुम्ही काय ते बरोबर, आणि माधव गाडगीळ वगैरे इतर चूक? ह्याला काय अर्थ आहे? बरं माझ्या मते मंदारने तुम्ही लिहिलंय ते चूक आणि माधव गाडगीळ बरोबर अशा अर्थाने तो दुवा दिलेला नसावा. असो".

मंदारनी म्हंटलय:

"हा दुवा पाहा, संगीत आणि जगण्याची मूळ प्रेरणा यांचा संबंध अगदी छान समजावून सांगितलेला आहे".

यावर मी म्हंटलय की संगीत हे बेसिक इंस्टींक्ट मधून येत नाही. तुम्ही संगीत इतक्या खाली निऊ शकत नाही.

२) जर तुम्हाला सत्य गवसलं तर तुम्ही संगीतात देखील प्रवेश करता हे मी सांगायचा प्रयत्न करतो आहे. मला शास्त्रिय संगीत आणि सुगम संगीत यात तुलना करायची नाही तर सामान्य माणसाला, (खरं तर तुम्हाला) देखील संगीत उपलब्ध कसे होईल हे सांगायचे आहे.

३) जीजस, आईन्स्टाईन, ओशो, एकहार्ट यांनी संगीत निर्माण केले नाही पण त्यांच्या बोधातून तुम्ही वर्तमानात किंवा समय शून्यतेत येता आणि संगीताला उपलब्ध होता असं मला म्हणायचं आहे

४)...." जे वाजवायचं ते पूर्णपणे स्मरणात राहण्यासाठी जे करतात तो रियाज. स्मरणाबरहुकूम वाजवणं म्हणजे रियाज ही व्याख्या पटत नाही".

तुम्ही स्वतः  सोलो-वादन करत असाल तर ही उघड गोष्ट आहे कारण वादन म्हणजे स्वतःला फॉलो करणं आहे 

५) ..."स्मरण आणि शारिरिक क्रिया ह्यांच्यात समयशून्यता हवी हे पटलं."

जे पटलं त्या बद्दल धन्यवाद कारण समय-शून्यता म्हणजेच सत्य! तीच तर माझ्या लेखाची सुरूवात आहे! आता माझा लेख परत वाचा म्हणजे मी काय म्हणतो ते समजेल.

बाय द वे, विजय आणि हरिभक्त तुमच्या प्रतिसादां बद्दल धन्यवाद

संजय