संजय,
प्राण्याची मूळ प्रेरणा ही 'जगणे' असते. आणि त्याप्रेरणेचीच एक उपप्रेरणा ही वंशवृद्धी (म्हणजे वंशरूपाने 'जगणे') असते. या मूळ प्रेरणेस साजेश्या कृती केवळ आहार, निद्रा, विहार आणि मैथुन यात बंदिस्त करू नका. इतर अनेक गोष्टी या जगण्याच्या मूळ प्रेरणेशी जोडता येतील, परंतु आहार, मैथुन याच्याशी जोडता येणार नाहीत (त्यातिल काही 'भय' किंवा 'संरक्षण' याच्याशी जोडता येतिल). उदा. बरेच प्राणी आपापले घर बांधतात. त्यातिल काही प्राण्यांचे घर बर्यापैकी क्लिष्ट (आणि आपल्या दृष्टीने सुंदर) असते. मुंग्या, मधमाश्या यासारखे कीटक अतिशय समृद्ध सहजीवन जगत असतात (भूक आणि मैथूनाच्या बरेच पलिकडे, कारण मधमाश्यातील बर्याच कामकरी माश्यांना मैथुन कधी अनुभवास मिळत नाही, तसेच काहीही काम न करणार्या राणीमाशीसाठी त्या बरीच मेहनत करत असतात.)
मनुष्यही घर बांधतो, समाज करून राहतो, आणि अश्या अनेक गोष्टी करतो की ज्या भूक किंवा मैथूनाशी संबंधित नसतात. पण तरीही त्यातून आनंद मिळत असतो. कारण सुरक्षिततेशी त्याचा बर्यापैकी संबंध असतो.
माधव गाडगीळांनी (गडकरी नव्हे बरे का) मनुश्याच्या बाबतीत संगीताचा संबंध असाच सुरक्षिततेशी जोडलेला आहे. माधव गाडगीळ संगीताच्या कितपत शिकलेले आहेत या बाबत माहिती नाही (किंवा आपण त्यात नक्की काय शिकला आहात तेही माहिती नाही) परंतु विज्ञान विषयात मात्र त्यांचा हातखंडा निश्चित आहे यात वाद नसावा. आता गाडगीळच बरोबर आहे असे मी म्हटले, आणि 'क्षीरसागर किंवा तत्सम विज्ञानात गती नसलेल्यांचे असे चुकीचे मत असते' असे विधान करून टाकले तर?
ज्याप्रामाणे एखादा चांगला वादक कोणतेही गाणे सहजतेने वाजवू शकतो, त्याप्रमाणे माझा संगणकही मिडी फाईल दिल्यास (रेकॉर्डिंग नव्हे) कोणत्याही गाण्याचे कोणत्याही वाद्यावर अगदी सुरेल वादन करू शकतो. ज्याप्रमाणे आपण गाडी चालवायला शिकल्यावर गरज तेव्हा ब्रेक मारणे, गीअर बदलणे वगैरे कृती आपोआप होतात (या बाबतीत शरीर आणि मनाचा सुसंवाद असतोच, नसल्यास त्या शरीरात मन राहणारच नाही), त्याच प्रमाणे कसलेल्या वादकांचे आहे.
आता तुमच्या वरील उत्तरावरून संगीत हे शिकायचे असते की नसते या बद्दल जरा प्रश्न पडला आहे. म्हणजे मूळ लेखात 'शास्त्रीय संगीत न शिकलेले बाण्ड्वाले गाणी उत्तम वाजवतात, तर शास्त्रीय संगीत शिकलेल्या एखाद्याला अमुक गाणे वाजव म्हटल्यावर वादन करता येत नाही' असे म्हटले आहे तर प्रतिसादात 'संगीत हा प्रयत्न आणि कौशल्याचा भाग आहे' असे म्हटले आहे (म्हणजे अभ्यास आला).
शंका : 'स्पेस इज फोर्थ डाय्मेन्शन ऑफ टाईम' की, 'टाईम इज फोर्थ डायमेन्शन ओफ स्पेस'?
मूळ प्रतिसादाचा हेतू : चैतन्य ने म्हटल्याप्रमाणे क्षीरसागर चूक आणि गाडगीळ बरोबर असे म्हणण्यासाठी प्रतिसाद दिलेल नसून, मूळ लेखात 'संगीतातून आनंद मिळण्याचे कारण काय' असा प्रश्न लेखकाने उपस्थित केलेला असल्याने तो दुवा दिलेला आहे.