ऑफिसच्या कामात विरंगुळा म्हणून आम्ही मित्र मराठी साहित्याची देवाण घेवाण करतो. बऱ्याचदा लेखकाचे नाव दिलेले असते. उदा.  कवी मकरंद सावंत यांच्या तीन ओळींच्या कवितांचा अतिशय चांगला असा पुस्तकरुपातला संग्रह - त्रिवेणी पण माझ्याकडे पी.डी.एफ. आहे. कितीजणांनी वाचलाय? मला आवडेल तो तुमच्यासोबत शेअर करायला. तशी नाही तर अशी साहित्यसेवा करायला मिळतेय. काय हरकत आहे? तुम्हीही सांगा मनमोकळेपणाने आवडला की नाही ते. उगाच हा 'अमक्या अमक्याचा लेख आहे' असं कशाला सांगत बसताय. आम खाने का, गुठलियां कायको गिननेका?? शिवाय मी लेखाच्या सुरवातीला तसं कबुल करतोयच ना? लेखकाचं / कवीचं नाव उपलब्ध असतं तर टाकलं असतं. आणि त्यांचे लेख / कविता माझ्या नावावर प्रसिद्ध करून मला काय मिळणार आहे? तुमच्या सारख्या रसिकांसमोर मी 'हा माझा लेख आहे' 'तो माझा लेख आहे' करून फुशारक्या मारणं (किंवा टिंग्या मारणं) म्हणजे ओव्हन चालवण्यासाठी आख्खा पॉवर प्लॅंट उभारण्यासारखं आहे (बरोबर.. ओळखलंत निरर्थकच आहे ते) फ़क्त कृपा करून माझ्या उत्साहावर पाणी नका फिरवू म्हणजे झालं.

आपला,

(साहित्यप्रेमी) कंदी पेढा