आपली जी लेखमाला आहे ती अध्यात्मविषयक आहे. त्यांत जीझस - येशू - वगैरे लोक आले इतपत ठीक आहे. कृपया त्यांत व्यवस्थित अभ्यास केल्याशिवाय शास्त्रज्ञांना आणून चुकीचीं विधानें त्यांच्या तोंडी घालूं नयेत वा संगीत पण आणूं नये. स्पेस टाईम ही एकच संकल्पना असून तिला चार परिमाणँ आहेत. ही संकल्पना कळायलाच फार अवघड आहे.
आईनस्टाईन हा उत्तम पियानोवादक होता. त्याची पत्नी मिलेव्हा संगीतज्ञ होती. ती अनेक वेळां त्याला पियानोवर रचना वाजवायला सांगत असे. सापेक्षतेचा सिद्धांत डोक्यांत घोळत असल्यामुळें तो एकदा शूबर्टची रचना पियानोवर वाजवूं शकला नव्हता म्हणून त्याचें वैवाहिक आयुष्यच धोक्यांत आलें होतें.
एकदा एक राग हार्मोनियमवर शास्त्रीय पद्धतीनं शिकताना मी शिकवणाऱ्यांना त्या रागातलं गाणं वाजवून दाखवायला सांगितलं तर त्यांना ते जाम जमलं नाही.
हें पटलें नाहीं. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत हें स्वरप्रधान, संयत भावनांची अभिव्यक्ती करणारें संगीत आहे. संयत भावना ही शास्त्रीय संगीताची मर्यादा आहे. तीव्र भावना हा प्रांत सुगम संगीतवाल्यांचा आहे. शास्त्रीय संगीताच्या शिस्तीप्रमाणें त्यांनीं तें वाजवलें नसणार. मुंबईतील रेल्वेगाडीतल्या भिकाऱ्यांना जें जमतें तें त्यांना जमत नाहीं असें कसं होईल.
सुधीर कांदळकर