आचार्य अत्रे यांच्याखेरीज साठोत्तरीच्या दशकांमध्ये मोठी गर्दी खेचणारा एकमेव वक्ता म्हणून प्रा. भोसले यांचे नाव घ्यावे लागेल
हे लोकसत्तेतले विधान अगदी पटण्यासारखे आहे.

सुमारे चाळीस वर्षापूर्वी  विवेकानंदांवरच्या त्यांच्या व्याक्यानमालेतल्या एका व्याख्यानाला जाण्याचा योग आला होता. एस एस सीला असणारे विद्यार्थी त्यांच्या भाषणाची टिपणे काढताना मी पाहिलेले आहे. (त्यांचा उद्देश असा की  परीक्षेत निबंधांत वापरायला ही वाक्ये उपयोगी पडतील! )

"... (विद्यालय कसे हवे ते सांगून, आता शाळेनंतर कुणी ज्ञान मिळवायचा प्रयत्न करीत नाहीत असे सांगण्यासाठी )... हल्ली विद्यालय म्हणजे विद्येचा लय होण्याचे ठिकाण... " असे काहीसे वाक्य तेव्हा चांगलेच मनात ठसले होते!