१) मूळ प्रेरणा म्हणजे स्वतःचे 'अस्तित्व टिकवणे' याविषयी मनोगतवर बराच उहापोह झाला आहे (माझ्या लेखांवर लिहीले गेलेले तीन लेख). त्यात अध्यात्म आणि प्रेम हे फोल असून बेसिक इंस्टींक्टच मूळ आहे असे समर्थन करण्याचा प्रयत्न होता. आता मूळ प्रेरणा ही नैसर्गिक आहे कारण निसर्गालाच स्वतःची पुनर्निर्मीती हवी आहे त्यामुळे मी सांगीतलेल्या चार क्रिया या निसर्गतः आनंद देणाऱ्या आहेत. तुम्हाला सुरक्षीतता (घर) देखील स्वतःचे अस्तित्व टिकेल म्हणून आनंद देते. माधव गाडगीळ म्हणतात तसा संगीताचा सुरक्षीततेशी संबंध नाही, त्याचा संबंध मी म्हणतो तसा समय शून्यतेशी आहे. त्यामुळे माधव गाडगीळांचे विधान चुकीचे आहे असे मी म्हंटले आणि ते आगदी उघड आहे. त्यांच्या विज्ञानातल्या वक्तव्या विषयी मी काही लिहीले नाही.

२) ..."ज्याप्रामाणे एखादा चांगला वादक कोणतेही गाणे सहजतेने वाजवू शकतो, त्याप्रमाणे माझा संगणकही मिडी फाईल दिल्यास (रेकॉर्डिंग नव्हे) कोणत्याही गाण्याचे कोणत्याही वाद्यावर अगदी सुरेल वादन करू शकतो."

मी तुम्हाला (तुमची इच्छा असेल तर) संगीताचा सक्रीय आनंद घेता यावा, संगीत सोप्या पद्धतीनं शिकता याव या हेतू नि लिहीलं आहे.  

३) तुम्ही तिथून पुढे काय लिहीलं आहे ते मला तरी समजत नाही.

तरी मी एक सांगू शकतो की 'मन हे जरी शरीरातच असले' त्याचा शरीराशी नेहेमी समन्वय नसतो.  ड्रायविंग करताना तुम्ही शरीरानी गाडीत आणि मनानी भलतीकडेच असता पण संगीतात असं करता येत नाही हे तुम्ही वादन शिकलात तर तुम्हाला कळू शकेल.

आणि माझ्या मते संगीत (विषेषतः वादन) हा मन आणि शरीर यांचा समन्वय साधण्याचा अत्यंत हृदयंगम मार्ग आहे. 

४) शेवटी, स्पेस इज द फोर्थ डायमेंशन ऑफ टाईम हेच बरोबर आहे कारण टाइम इज अ कन्सेप्ट अँड इट कॅन बी मेजर्ड बट स्पेस हॅज नो डायमेंन्शन्स.

बाय द वे मला मनोगतींच्या विचार पद्धतीचं नेहेमी आश्चर्य वाटत आलं आहे मी ज्यावेळी युद्ध चूक आहे म्हणतो (कारण ती खरी बेसिक इंस्टींक्टची प्रेरणा आहे) त्यावेळी इतकी उघड गोष्ट अध्यात्मिक शब्दांखाली वादाला घेतली जाते. मी ज्यावेळी समय शून्यता आणि संगीत या विषयी लिहीतो त्यावेळी संगीत ऐकताना आपण 'वेळेचं भान राहीलं नाही' असं म्हणतो आणि त्यातूनच आनंद निर्माण झालेला असतो यावर मला लिहावं लागतयं!

संजय