नमस्कार,
आम्हाला काव्यातले काही कळत नाही. पण
शेवटी राहिले, घर सुनेच्या सुने
उंबऱ्यावरच मी, तणतणत राहिलो
या शेरावरील आपला
दुसरी ओळ लयीत गडबडलीय. तसेच हस्व अक्षरांचा वापर अतिशय केल्याने काही शेर किंचीत सैल झालेत. भटांच्या कवितेत असे विरळच.
हा ज्ञानामृताने भरलेला अभिप्राय पाहून अजून गोंधळून गेलो म्हणून हा लेखनप्रपंच.
आमच्यामते गालगा, गालगा, गालगा, गालगा हेच वृत्त या शेरातही कायम आहे. तसेच काफियाचे वळण पहिल्याशेरापासून तेच कायम असल्यामुळे शेर सैल झालेत हे विधान पटण्यासारखे नाही.
किंबहुना, दादांच्या रचनेत काही सैल आहे हे आजपर्यंत पाहण्यात आलेले नाही. एवढे काटेकोरपणे लिहिणारा माणूस विरळा.
धोंडोपंत