यःकश्चित्, दुःख, कःपदार्थ, निःपात, निःसंशय, निःशंक, निःक्षत्रिय, दुःशासन वगैरे शब्दांत विसर्गाचा उच्चार ह् होत नाही. वाक्याच्या शेवटी आलेल्या विसर्गाचा उच्चार ह-सदृश होतो, अन्यत्र तो तसा होतोच असे नाही.
बाबा वाक्यं प्रमाणम् या नियमाला अनुसरून आम्ही रामाः चा उच्चार रामाहा, रामैः चा रामैहि, रामोःचा रामोहो, रामुःचा रामुहु करत असू. खरे उच्चार जर असे नसतील तर ते आम्हाला कुणी शिकवलेच नाहीत.