१) प्रथम आईन्स्टाईन पियानो वाजवायचा हे वाचून मी फार खूष झालो कारण ज्याला स्पेस हे परिमाण गवसलं त्याला संगीत गवसलं हेच मला म्हणायचं होतं!

२) स्पेस आणि टाईम या एकच संकल्पना आहेत हे वाचून देखील मला फार आनंद झाला. त्या दोन्हीही संकल्पना आहेत हे समजायला अवघड वगैरे नाही कारण ज्याला त्या संकल्पना आहेत हे समजले तो त्या दोन्ही पासून मुक्त होतो. मी त्यांची चारीही परिमाण मांडू शकतो पण सध्या संगीत हा विषय आहे.

३) ..."कृपया त्यांत व्यवस्थित अभ्यास केल्याशिवाय शास्त्रज्ञांना आणून चुकीचीं विधानें त्यांच्या तोंडी घालूं नयेत वा संगीत पण आणूं नये".

विज्ञान आणि अध्यात्म या अस्तित्वाचं रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन प्रक्रिया आहेत त्यांच्यात विरोध नाही फक्त शास्त्रज्ञ ते शेवट पर्यंत उलगडण्याच्या प्रयत्नात राहतो आणि ज्ञानी त्या रहस्यात रममाण होतो इतकच.

त्यामुळे आईन्स्टाईनला विचारलं की तू पुढल्या जन्मी परत शास्त्रज्ञ होशिल का? तर तो म्हणाला कदापि नाही मी प्लंबर होईन पण शास्त्रज्ञ नाही कारण हे विश्वाचं कोडं आत्ता सुटेल मग सुटेल असं वाटत राहतं पण ते काही केल्या सुटत नाही!  

४) आता, मी जे लिहीतो तो माझा अनुभव असतो त्यामुळे माझ्या ज्ञानाविषयी तुम्ही निश्चिंत रहा. त्यातून मी अध्यात्म हे सर्वस्पर्षी आणि जगणं आनंदाचं करणारं शास्त्र मानतो त्यामुळे मी माझ्या विषयाचा पूर्ण अभ्यास करूनच लिहीत असतो.

५) माझ्या लेखनाचा उद्देश किंवा मला अभिप्रेत अर्थ : मी क्लास सोडला म्हणजे शास्त्रिय संगीत गौण आणि सुगम संगीत श्रेष्ठ असा तुम्ही घेतला आहे. मला एवढच म्हणायचं आहे की संगीत तुम्हाला वर्तमानात आणतं मग तुम्ही लोकल मधल्या भिकाऱ्या कडून शिका की कुण्या उस्तादा कडून शिका.

तुम्ही जे म्हणता आहात की शस्त्रिय संगीत भावनेची संयत अभिव्यक्ती आहे आणि सुगम तिव्र अभिव्यक्ती आहे हे फार धाडसाचं आहे कारण भावनेची संयत अभिव्यक्ती करणारी अनेक सुगम गाणी आहेत, फरक फॉर्मचा (मांडणीचा) आहे. मी ही त्यांना भावनेची संयत अभिव्यक्ती करणारं गाणंच वाजवून दाखवायला सांगीतलं होतं.

त्यातून पुढे जाऊन मला असं म्हणायचं आहे तुम्हाला संगीत अवगत व्हायला शास्त्रिय संगीतच शिकायला पाहिजे असं नाही, तुम्ही सोप्या पद्धतीनी संगीत शिकू शकता आणि समय शून्यतेत येवू शकता.

संजय