संगीत ही एक भक्कम शास्त्राधार असलेली सादरीकरणाची कला देखील आहे. संगीताचा आनंद भावनिक (उदा. मारवा ऐकून उदास वाटणे, ललत ऐकून पहाट झाली असे वाटणे), बौद्धिक (उदा. लयकारीची जाण असणे, जयपूर - अत्रोलीच्या बलपेचाच्या गायकीतली सौंदर्यस्थळे उमजणे इ.) आणि आत्मिक (उदा. बाथरूममध्ये शॉवर खाली उभारून मनसोक्त शिट्टी मारत निर्विकल्प समाधी अनुभवणे इ. ) कसाही आपापला वकूब आणि कल यानुसार घेता येतो.

हा दुवा स्मरण, अनुसरण, सृजन  (व्यासंग/ विद्वता, तयारी/ रियाझ, कल्पकता/ उपज) यांचे एक उदाहरण आहे. या गोष्टी वादनाचा आनंद स्वतः घेणे आणि तो मुक्तहस्ते वाटणे यात आडव्या येत नाहीत याचेही एक उदाहरण म्हणता येईल.

उ. निजामुद्दीन खान