सुधीरजी, आपला मुद्दा एकदम पटला. खरंतर मनोगत हे पहिलच ठिकाण असं आहे जेथे मी स्वतःहून काहीतरी करायचा प्रयत्न करतोय. त्या ओघात वृत्तपत्रात प्रकाशीत झालेला लेख (हे मला माहित नव्हतं) फक्त आस्वाद घेण्याच्या निर्भेळ हेतुने इथे दिला. मी माझी चुक कबुल करतो, त्या लेखाच्या लेखकाचे नाव वगैरे तपशील द्यायला हवा होता पण मुळातच तो माझ्याकडे आलेल्या ई- पत्रात नसल्यामुळे देउ शकलो नाही. आणि 'संग्रहातील लेख' म्हणणे हा संदीग्धपणा होतो हे ही या निमित्ताने कळले. (म्हणजे जर हा सुरेख माझा लेख असता तर मला तसं सांगायला आनंदच झाला असता, उगाच कशाला संग्रहातील वगैरे लेख म्हणत बसलो असतो.)
असो. चर्वितचर्वण बरेच झाले.
चुक भुल देणे घेणे.
राग नसावा. लोभ असावा.
तसदीबद्दल क्षमस्व.
कळावे.
आपला,
(चवीष्ट) कंदी पेढा.