संजय जी, धन्यवाद! आणखी एक पैलू आहे. दोन (वा अधिक) 'तयार' कलाकार एकत्र येतात, तेव्हा त्यांच्या साद प्रतिसादातून/ एकमेकांच्या 'सांगितिक खोड्या' काढण्यातूनही  एक वेगळेच रसायन जन्माला येते. 

पन्डित शिवकुमार शर्मा - झाकिर हुसेन

पाश्चात्य संगीतातील वाद्यमेळ 'टीम वर्क' चे उत्तम उदाहरण ठरू शकेल. जर्मनीमध्ये टीव्ही चे रंगीत प्रक्षेपण सुरू झाल्यावर दुसर्याच दिवशी सादर झालेला हा कार्यक्रम.

बर्ट केम्पफ़र्ट

या विषयात गोडी असणार्यानी 'नादवेध'  हे अच्युत गोडबोले, सुलभा पिशवीकर यांचे पुस्तक अवश्य वाचा. क्लिष्ट तांत्रिक चर्चा तसेच शेंडा बुडखा नसलेले गोलमाल भाष्य दोन्ही टाळत रसग्रहण कसे करावे याचा हे पुस्तक वस्तुपाठच आहे.