असच म्हणावं लागतं. खरं तर प्रत्येकच भाषा १२ मैलांवर बदलते, त्यामुळे एकच उच्चार असणे शक्य नाही. त्यात हा प्रमाण आणि तो नाही, हे खरंच चुकीचं वाटतं.
भारतीय इंग्रजीला हसणारे फक्त भारतीयच. (किंवा ज्यांची मूळ भाषा इंग्रजी नाही ते)... खुद्द ब्रिटनमध्ये भारतीय विद्यार्थी स्पेलिंग आणि इतर भाषासंबंधित स्पर्धा जिंकतात. असो.
संभाषण कौशल्य विकसित करण्यासाठी श्रवणकौशल्य विकसित करणे आवश्यक असते. आपण कोणती इंग्रजी ऐकतो, यावर आपण कशी इंग्रजी (किंबहुना कोणतीही भाषा) बोलते, हे अवलंबून असते. पूर्वी यांकरिता एखाद्या व्यक्तीवर (विशेषतः शिक्षक) अवलंबून राहावं लागायचं. आता तसं उरलेलं नाही. पण दृकश्राव्य माध्यमाचा वापर कसा करावा, हे फक्त बी.एड. ला उत्तर लिहिण्यापुरतंच मर्यादित राहिल्यामुळे, श्रवण आणि पर्यायाने संभाषण कौशल्य विकसितच होत नाही
असो. इंग्रज किंवा अमेरिकन जसं इंग्रजी बोलू शकतात तसं इतर कोणीही बोलूच शकणार नाही, कारण त्यासाठी लहानपणापासून टाळूवर तसे आघात होणे गरजेचे असते. ते नंतर दुरुस्त करता येत नाही. तुमचं म्हणणं समोरच्याला कळतं, हे महत्त्वाचं.
अवांतर :- आपल्याला मराठी शब्दांचे उच्चार १००% बरोबर करता येतात, असं तरी आपण छातीठोकपणे सांगू शकतो का ? मग इंग्रजी तर दूरच राहिली.