शेवटची ओळ वाचून 'सारान्श' चित्रपटाचा शेवट आणि अनुपम खेर, रोहिणी हट्टंगडी यांचा अभिनय आठवला.

नेमके आठवत नाही, पण परदेशात अकाली मृत्यू आलेल्या मुलाच्या अस्थी मिळवण्यासाठी लाच देण्याची वेळ यावी, आणि ती मागणारा आपलाच विद्यार्थी निघावा असा काहीतरी विषण्ण करून टाकणारा अनुभव नायकाला येतो.  बगिचातला 'हळूच डोकावणारा एक कोंब' पाहूनच त्या वृद्ध दांपत्याला दिलासा मिळतो असा विधायक शेवट केलेला आहे.