प्रदीपजीः आपला प्रतिसाद माझ्या प्रतिसादाला आहे हे धरून लिहीत आहे.
- अलबत्!
* *
कुठल्याही प्रांमाणिक आणि डोक्यात हवा न शिरलेल्या कवीकडून मला असेच उत्तर अपेक्षित आहे.
- नक्कीच. नक्कीच. भटसाहेब अत्यंत प्रामाणिक होते. त्यांच्या डोक्यात कुठलीही हवा शिरलेली नव्हती. म्हणूनच ते असे उत्तर देऊ शकले होते. ते अप्रामाणिक असायला, त्यांच्या डोक्यात हवा शिरायला ते आजच्या पिढीतील काही तथाकथित कवींसारखे थोडेच होते?
... आणि 'मला असेच उत्तर अपेक्षित होते' म्हणजे? तुम्ही कोण? गझलेच्या क्षेत्रातले तुमचे कर्तृत्व काय?
* *
सामान्य लोकांकडून अशी भावना ठीक असते. पण जेव्हा गझलकार असे वागतात तेव्हा वाईट वाटते.
- गझलकार सामान्य माणसे नसतात की काय? आणि गझलकार असे वागतात म्हणजे कसे वागतात? एखाद्या गझलकाराने कुणाला काय म्हणावे, कुठल्या उपाधीने संबोधावे, यावर नियंत्रण ठेवणारे तुम्ही-आम्ही कोण? आणि असे नियंत्रण एखाद्यावर का ठेवायचे? पटत नसेल तर साफ दुर्लक्ष करण्याचा पर्याय आपल्या हाती नाही काय? (वरील उपाधींपैकी बालगंधर्व ही जी उपाधी आहे, ती नारायणराव राजहंसांना कुण्या सोम्यागोम्याने दिलेली नव्हती. ती साक्षात टिळकांनी (लोकमान्य मुद्दामच लिहीत नाही... कारण तीही एक उपाधीच आहे! ) दिलेली होती. आणि टिळक हे इमोशनल नव्हे; तर रॅशनल म्हणूनच प्रसिद्ध होते. बुद्धिप्रामाण्यवादी माणसालाही भावनिक पातळीवर अनेकदा यावे लागते, ते असे. अशा भावनिक पातळीवर जिथे लोकमान्य - क्षमा असावी- टिळकही आले होते, तिथे तुमच्या-आमच्यासारख्या सामान्यांची काय कथा? )
* *
व्यक्तिशः मी त्यांना कधी भेटलो नाही. त्यामुळे त्यांच्या प्रेमळपणाची कल्पना नाही.
- काहीच हरकत नाही. तुमचे त्या वेळी त्यांना भेटण्याचे वयही नव्हते. त्या वेळी त्यांच्या तथाकथित शिष्यांशी तुमची अधिक जवळीक होती.
* *
'गझलसम्राट' होण्यासाठी त्याची (प्रेमळपणाची) गरज आहे की नाही माहीत नाही.
- गझलसम्राट होण्यासाठी प्रेमळपणाची गरज नसेलही कदाचित; पण चांगला माणूस होण्यासाठी ती नक्कीच आहे आणि चांगला माणूस असल्याशिवाय कवीही होता येत नाही.
- गझलसम्राट ही पदवी भटसाहेबांना मान्य नव्हती, याचे पुन्हा एकदा स्मरण करून देतो. पण घडीभर असे धरून चालू की, ते 'गझलसम्राट' होते. एखाद्या क्षेत्रातील सम्राट, राजा बनण्यासाठी त्या त्या क्षेत्रात, त्या त्या काळात उत्तुंग कामगिरी करावी लागते. अशी कामगिरी भटसाहेबांनी गझलेच्या क्षेत्रात केलेली आहे की नाही, हे मराठी जनता जाणते. आणि या जाणिवेपोटीच चाहत्यांपैकी कुणीतरी त्यांना कधीतरी 'गझलसम्राट' म्हणून गेले असेल. भटसाहेबांची ही कामगिरी चिमूटभर तथाकथित समीक्षक किंवा छटाक छटाक गझला लिहिणारे आजचे काही 'किरकोळ कवी ' जाणोत न जाणोत!
* *
वरील ओळींचे प्रयोजन आहे का, असा प्रश्न पडला.
- निश्चितच आहे. (वरील ओळ अप्रयोजनात्मक असेल तर तुमचा आधीचा, एकदम पहिला, प्रतिसादही अप्रयोजनात्मकच आहे. ) नवागतांना उमेद देण्याचा प्रयत्न भटसाहेब कसा करीत असत ते निदर्शनास आणून देण्यासाठी या उदाहरणाचे प्रयोजन निश्चितच आहे. जेव्हा एखादा होतकरू (गझल)गायक गायनाच्या क्षेत्रात काही करू इच्छितो, तेव्हा त्याला त्याच क्षेत्रातील शिखरावरील मान्यवराने प्रोत्साहनापोटी, त्याची उमेद वाढावी, टिकून राहावी, यासाठी अशी एखादी उपाधी दिल्यास त्याच्यासाठी तो मोठा दिलासा ठरू शकतो. पुढे या उपाधीला आपल्याला जागायचे आहे, याचे स्मरणही आपल्या कलेचा दर्जा टिकवून ठेवण्यास साह्यकारी ठरते. इतकेच.
* *
- निश्चितच अश्या उपाधीवाटपामुळे भट 'गझलसम्राट' बनले नसावेत.
- नाही. नाही. अशा उपाधी वाटून ते 'गझलसम्राट' नक्कीच बनले नाहीत. तशी त्यांना आवश्यकता नव्हतीच मुळी किंवा आपल्याला कुणी 'गझलसम्राट' म्हणावे म्हणूनही त्यांनी अशा 'उपाधीवाटपा'चा रमणा उघडलेला नव्हता. अशी एखादी उत्स्फूर्त उपाधी देणे हा त्यांच्या दिलखुलासपणाचा, उमदेपणाचा एक भाग होता आणि बुजुर्गाने दिलेली उपाधी मानाने मिरविण्याची (किंवा विनम्रपणे नाकारण्याचीही) प्रथा गेल्या पिढीत होती.
भलेही भटसाहेबांना आवडत नसो; पण त्यांना 'गझलसम्राट' ही उपाधी त्यांच्या चाहत्यांनी दिली होती आणि ती अशासाठी दिली होती की, भटसाहेब उत्तमोत्तम, दर्जेदार गझला लिहीत. ही वस्तुस्थिती कुणालाच नाकारता येणार नाही. हां, बांधणाऱयांनी डोळ्यांवर पट्टी खुशाल बांधावी. कानात बोळे खुशाल घालावेत.
आज जे जे कवी आपापल्या वकुबानुसार, मगदुरानुसार गझल लिहीत आहेत, ती भटसाहेबांनी गझलेची ' सोपी केली पायवाट '! म्हणूनच. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, गेल्या पिढीतील बुजुर्गांवर शिंतोडे उडवून आजच्या पिढीतील कुठल्याच कवीला मोठे होता येणार नाही. त्यासाठी चांगले आणि चांगलेच लिहावे लागेल... मग ती गझल असो, गाणे असो की कविता असो...
* *