Prathamesh's Blog... येथे हे वाचायला मिळाले:
काही दिवसांपूर्वी एका मैत्रिणीचा मेल आला होता. त्यात साईबाबांचे चित्र होते व खाली लिहिले होते की हा मेसेज अमुक-अमुक जणांना पाठवा, तेवढया जणांना पाठवला की येत्या दहा दिवसांत तुमची इच्छा पूर्ण होईल आणि जर मेसेज नाही पाठवला तर येत्या २४ तासांत तुम्हाला एखादी वाईट घटना कळेल. मेल वरून कळंत होतं की तो बराच फिरून आलाय (म्हणजे बरेच बकरे बळी पडलेत ).