शिवरायांवर रचलेले काव्य... येथे हे वाचायला मिळाले:
चौक १ज्याची कीर्ति सार्या जगतांत । मृत्यु लोकांत दख्खन देशांत ।
महाशूर शिवाजी अवतरला । हिंदुधर्माच्या रक्षणाला ॥जी॥
असुरांनिं सारा मुलुख पिडिला । मानिना कोणी देवाजीला
ऋषींचा होम बंद पडला । न्याय नाही जगामंदि उरला ।
माय वळखिना लेंकराला । लागली चिंता महादेवाला ।
इचार केला बसुनि कैलासाला । दैत्यांचा मोड करायाला ।
अवतार शिवाजीला झाला । गा व्हय म्हन दादा, दादा रजी र दा जी०॥१॥
चौक २
गोरगरिबांचा कैवारी । राजा अवतारी ।
...