मला खालीलप्रमाणे वाटते.

१. चाहते कलावंताला प्रेमाने व उत्स्फुर्तपणे उपाधी देऊन नावाजतात. त्यात इतरांना हरकत असू शकत नाही. चाहते उत्स्फुर्तपणे व शुद्ध प्रेमाने असे करतात कारण तो कलाविष्कार व कलाकार त्यांच्या मनाच्या तारा छेडतो

२. इतर कला व कविता यात फरक आहे असे वाटते. जसे 'गानसम्राज्ञी' हे बिरूद मिळालेल्या लता मंगेशकरांनी एखाद्या गाण्याचे किती 'टेक्स' घेतलेले असतात ते माहीत नसते. गायन, अभिनय, चित्रकला, शिल्पकला, वादन, रेस, इतर क्रीडाप्रकार या कलांमध्ये रियाजाने दर्जा सुधारतो व सुधारत जातो. कवितेमध्ये वाचनाने किंवा रियाजाने सफाई येऊ शकेल किंवा नवीन रेडिमेड विषय मिळू शकतील. पण मुळात कवीची जी क्षमता आहे व जी कवीवृत्ती आहे ती बदलू शकत नाही. त्यामुळे, सम्राट ही पदवी कवीला मिळणे मला अयोग्य वाटते. 'पेले' फुटबॉलचे सम्राट, लता मंगेशकर गानसम्राज्ञी, सचिन फलंदाजीचा सम्राट हे योग्य वाटते. कवी सम्राट होणे जरा वेगळे वाटते. तुकारामांना आपण कुठे ओवीसम्राट म्हणतो? अद्वितीय हे विशेषण अधिक योग्य वाटावे.

3. भटसाहेबांनी अनेक होतकरू कवी व गायकांना दिशा दाखवली या विधानाशी पूर्ण सहमत! त्या कवींनी मात्र मोठे झाल्यानंतर गझलेसाठी किंवा इतर कवींसाठी काहीच केलेले नाही. त्यांनी भटसाहेबांचेच गुणगान गाण्यात व 'हा ढळाया, तो पळाया' अशा गझला लिहिण्यात व मानधने मिळवण्यात सार्थक मानले. त्यांच्या दृष्टीने भटसाहेबांना गझलसम्राट असे उल्लेखणे ही त्यांच्या अस्तित्वाची गरज असावी. मला कवी म्हणून जाहीर अस्तित्व नाही राहिले तरी मला फरक पडत नाही. माझ्यामते भटसाहेबांनी अनेक वेळा गझलेच्या शेराची तलवार केलेली आहे जे गझलेत त्यापुर्वी इतक्या प्रमाणावर झाले नाही. यामुळे महाराष्ट्रातील बहुसंख्य गझलेच्छूंना आक्रमक स्वरुपाचे उल्लेख गझलेत आवश्यक वाटतात हे बघायला मिळाले.

४. त्याहून खूप वेगळ्या प्रकारची गझल आता लिहीली जाते हे मात्र नक्कीच! पण तरीही गझल लिहिण्याचे तंत्र भटसाहेबांनीच लोकांना शिकवले हेही मराठीवरचे उपकार मान्य केले तरी श्रद्धांजली आपोआपच येते मनात!

(संपादित : प्रशासक)