आत्ताच जर असे प्रश्न पडत असतील तर आमच्या सारख्यांवर जेव्हा तीनेक वर्षांनी चिलू - पिलूला शाळेत घालायची वेळ येईल तेव्हा मनगटाला चुना चोळूनच बसावं लागेल.
मागल्या आठवड्यात माझ्या मावशीच्या मुलीला नर्सरीला घालतेवेळी आलेला फी, मुलाखत यांचा अनुभव ऐकून "आता आपले कसे होणार?" हा विचार मनाला चाटून जाताजाता नेम चुकल्यामुळे घट्ट रुतून बसला आहे.