१) संगीत आणि समयशुन्यतेचा काय संबंध आहे हे आपल्या लेखातून सूचित होत नाही. संगीताशी समयशुन्यतेचा संबंध आपण दोन प्रकारे लावलेला आहे अ) संगीतात वेळेचे भान हरपणे  - झोपल्यावरही वेळेचे भान राहत नाही, त्यातूनही भरपूर आनंद मिळतो. म्हणजे झोप आणि समयशुन्यता यांचा संबंध आहे (झोप - पुन्हा मूळ प्रेरणा). संगीत आणि झोपेतून मिळणारा वेगळा आहे हे मला कळते, परंतु समयशुन्यतेचा त्याच्याशी काही संबंध नसावा. आ) संगीताचे स्मरण आणि वादन (शारीरिक क्रीया) यातील समयशुन्यता असते. आता ही समयशुन्यता ही वरील 'अ' पेक्षा वेगळी आहे. त्याचा संबंध खरेतर योग्य क्रीया योग्य 'वेळी' करण्यावर आहे. म्हणजे वादकाने एखादा सुर योग्य वेळी वाजवला, तर त्या सुराचा अपेक्षित 'समय' आणि प्रत्यक्ष 'समय' यात फरक नसतो म्हणजे शुन्य समय असतो. पण ती शुन्यता आपल्याला अपेक्षित आध्यात्मिक शुन्यता नसावी.
खरे तर संगीतात 'वेळे' ला खूप महत्त्व आहे. सर्व वादक, गायक एकाच आणि अपेक्षित वेळी 'समे' वर नाही आले तर गाण्याचा पार विचका होऊन जातो. सुर आणि ताल ही संगीताची मुख्य अंगे, त्यातील ताल हा तर समयावरच बेतलेला नाही का? मग समयशुन्यता कोठून आली?

२) संगीताचा आनंद हा गायन वादन किंवा श्रवण यापैकी कशातुनही मिळू शकतो.

३) ठरलेली सुरावट वाजवणे ही बर्यापैकी 'मेक्यानिकल' गोष्ट आहे. (त्यात उत्स्फुर्त रंग भरणे मात्र वेगळे)

४) या वाक्याचा अर्थच नाही कळला. इफ टाईम आलरेडी हाज ३ डायमेन्शन्स, विच आर दीज थ्री डायमेन्शन्स? भूत, वर्तमान, भविष्य ही काही वेळेची डायमेन्शन्स नव्हेत. वेळेप्रमाणे स्पेसही मोजता येते, आणि स्पेस ला तिन डायमेन्शन्स असतात (आता स्पेस ही तद्दन भौतिक गोष्ट आहे. त्यात आध्यात्म आणू नका. भौतिक स्पेस ला तिन डायमेन्शन्स असतात). बरे मूळ वाक्य आपण आईन्स्टाईन च्या खात्यात टाकले आहे म्हणून मी त्या बद्दल लिहीले.

सुधीरजी : आईनस्टाईन अतिशय उत्तम व्हायोलीन वादक होता हे माहिती होते (तसे फोटोही पाहिलेले आहेत), पियानो विषयी माहीत नव्हते.
आता मनोगती च्या मनोधारणेविषयीः पिण्डे पिण्डे मतिर्भिन्नः हे तर सिद्धच आहे. त्यामुळे 'युद्ध चूकच आहे' असे म्हणणे सर्व जण का मान्य करतील? त्यातून युद्ध हे एक सत्य आहे. युद्ध आजपर्यंत कोणत्याही महात्म्याला टाळता आलेल नाही. आपण जो आध्यात्मिक वारसा सांगता, तो टिकवायलाही युद्ध झालेलीच आहेत. आलेल्या शत्रुला शिंगावर घेतले नसते, तर आज शांततेचा संदेश देणारी आपली संस्कृती राहिलीच नसती.