बाकी,आणिक ताण नको म्हणूनच आम्ही  चर्चा  बरीक सदरात टाकली  ,हाय काय अन नाय काय  चं प्रतीक म्हणजे अवलोकन समित्या असा आमचा गैर समज झाला होता, तो  कुणी दूर करण्यास मदत करावी म्हणून चर्चा संदेश दिला ,कराल मदत ? पुढील काळात लेखन करून घेण्या आधीच माहिती करून घेतली म्हणजे संकेतस्थळांच्या मालक मंडळींना तसदी राहणार नाही  !

तुम्ही आम्हाला प्रश्न विचारला आता आम्ही तुम्हाला एक कोड विचारतो ,

ओळखाबरे मी कोण ?

"आमच्या बाबांनी  परिनिरीक्षणाचे केलेले काम , काही कारणाने अधुरे राहिले ते आमच्या कारकीर्दीत फूल्ल नाही फुलाची पाकळी  होण्याचा सुयोग दिसतो, फुलाची पाकळी तर फुलाची पाकळी महत्त्वाच म्हणजे सर्वांच समर्थन आहे, किमान विरोध नाही. बच्चमजी  सगळ्यांना सोबत घेऊन जायचं यालाच म्हणतात लोकशाही . "