पहिले म्हणजे तुमचे उत्तर बरोबर आहे. अभिनंदन आणि आभार.

म्हणजे प्रिय? साशंक आहे.

नाही. तुमचे बरोबर आहे. .... म्हणजे प्रिय नव्हे. .... म्हणजे कृपावंत (बहुधा). येथे नायक पत्र लिहीत आहे. .... हा बहुधा पत्राचा/अर्जाचा फॉर्मल मायना असणार (रिस्पेक्टेड मॅडम ... असा  ) आपण मराठीत काय मायना द्यावा असे वाटून मी 'प्रिय' असे निवडले. आधी

माननीया तुज म्हणू की, सुंदरी? मनमोहिनी? ... अशी ओळ लिहिली होती. .... तसेही चालले असते.

'म्हणू' की 'लिहू'?

पत्रात लिहिणे बरोबर आहे. पण आपण अग्रलेखात म्हटले आहे. प्रतिसादात म्हटले आहे असे म्हणतो. तेथे व्यक्त करणे अशा अर्थाने म्हणणे आहे. लिहू चालले असते हे खरे. म्हणू जास्त बरे वाटले.

तुमचा प्रतिसाद म्हणजे मेंदूला खुराक असतो.