आपण लेख लिहून सुपूर्त केल्यावर तो साईटच्या डेटाबेस मध्ये विराजमान होईपर्यंत प्रत्येक स्टेपला प्रॉब्लेम येऊ शकतो.
लेख सगळा जाण्याआधी
ब्राउझर क्रॅश होणे
पीसी क्रॅश होणे
राउटर क्रॅश होणे
पॉवर जाणे
आयएस्पी ची काही गडबड होणे.
इंटर्नेट क्रॅश होणे (आत पर्यंत झाले नाही पण होऊ शकते ! )
मनोगत जेथे आहे सर्व्हर तो सर्व्हर क्रॅश होणे,
मनोगताची स्क्रिप्ट क्रॅश होणे
सर्व्हरचा डेटाबेस क्रॅश होणे........... इ. इ.

त्यामुळे मी काय करतो, सब्मिट करण्याअअधी एचटेईमेल एडिट मध्ये जातो (एडिटर्च्या खालची दोन बटणे बघा) आणि सगळा एचटेईमेल मजकूर कॉपी करतो आणि एका नोटपॅड मध्ये चिकटवतो. तो सेव्ह करताना एनकोडिंग UTF-8 असे करून सेव्ह करतो.

समजा तो चिकटवायची वेळ आली तर नव्या लेखाच्या एचटेईमेल एडिट मध्ये तो चिकटवतो आणि पुन्हा डिझाइन मध्ये येऊन पुढे जातो.

हे तुम्हाला उपयोगी पडते का बघा.