"बाबा" ची भिंत ! येथे हे वाचायला मिळाले:
पाऊस म्हटलं की आम्हा शहरी लोकांच्या डोळ्यांपुढे चिखलाने, मातट पाण्याने भरलेल्या खड्ड्यांनी भरलेले रस्ते येतात. पच्च्कन पाणी उडवून जाणारी वाहनं, विजारी, साड्या घोट्यांच्या वर करून उशीर होऊ नये म्हणून घाईगडबडीत चालत जाणारी माणसं, पुढे आपल्या स्वतःला होणारा उशीर आणि मग आजार असलं काय काय येतं. पण हेच एखाद्याच्या डोळ्यांपुढे तुरळकच राहिलेली पण हिरवीगार झाडं, चहूबाजूला जाणवणारा निसर्गाचा तजेला, पावसातल्या पाण्यात थबक-थबक पाणी उडवत जाणारी, आपले रेनकोट, गंबूटांची पर्वा न करता आनंदाने जाणारी लहान मुलं, 'कावळा' झालेल्या छत्र्या, 'ती' भिजू नये, ...