आधीचा लेख नं २१ मस्तच होता.
एक, मी स्वतःला सर्वज्ञानी समजतो काय? (खास मनोगती स्टाइल), - हा हा
साधक या रहस्याचा शोध स्वतःत घेतो (मी कोण आहे? ) आणि ज्या क्षणी त्याला लक्षात येतं की हे रहस्य उलगडणार नाही त्या क्षणी तो त्या रहस्यात रममाण होऊन जातो, आनंदून जातो, ज्ञानी होतो! - साधकाला रहस्य उलगडणार नाही हे पटणं अवघड आहे. इथे माझीतरी काहीतरी समजून घेण्यात चूक होतेय किंवा तुम्ही अर्धवट लिहिलं आहे.
अजून एक,
निदान मला स्वतःला तरी असं वाटतं, की तुमची लेखमाला साधारणपणे लेख १२ पर्यंत वगैरे परिपूर्ण आहे. त्यानंतर त्याच फंडामेंटल्स भोवती आयुष्याच्या वेगवेगळ्या अंगांनी विचार होतो आहे. ते ठीक आहे, पण आवश्यक नाही.
(असो. पण, वेगवेगळे लोक कसा वेगवेगळ्या अंगांनी विचार करतात ते वाचायलाही मजा येते आहे.. )