१) ..."साधकाला रहस्य उलगडणार नाही हे पटणं अवघड आहे. इथे माझीतरी काहीतरी समजून घेण्यात चूक होतेय किंवा तुम्ही अर्धवट लिहिलं आहे." 

 माणसं मानसिक दृष्ट्या तीन प्रकारची आहेत : साधक, सूज्ञ आणि ज्ञानी.

साधक हा शोधक असतो (बहुदा तुझ्यासारखा! ) त्याला प्रक्रियेत रस असतो आणि त्याला वाटतं की 'मी कोण' हा शोध या न त्या प्रक्रियेनी आज ना उद्या लागेल. तो घनघोर साधना करत राहतो. त्याला शेवट पर्यंत उलगडा होत नाही.

सूज्ञ नुसत्या ज्ञानी काय म्हणतो ते एकण्यानी किंवा वाचण्यानी उलगडा होऊ शकेल या मनोवृत्तीचा असतो (मी तसा होतो), त्याला कष्टाचा कंटाळा असतो. सत्य समजण्या पूर्वी मी स्वतः किती तरी वेळा कम्यूनला जायचो पण मेडीटेशन जाम करायचो नाही, तिथल्या अप्रतीम पूल मधे पोहोणे, मनसोक्त हॉट शॉवर, फॉरीनर्सशी टेबल टेनीस खेळणे, तिथल्या ऑर्गॅनिक फूडचे भन्नाट जेवणे, पिरॅमीडस मध्ये झोपणे, समाधीतल्या अल्हादात नुसते बसून रहाणे असले कार्यक्रम करून घरी परत! तर सूज्ञ फक्त ज्ञानी माणूस काय म्हणतो ते समजवून घेतो. आजच्या घडीला एकहार्ट माझ्यापेक्षा किती तरी सरसपणे सत्य मांडू शकतो, तुम्ही नुसत्या एकण्यानी किंवा वाचण्यानी बोधाला प्राप्त होऊ शकता.

ज्ञानी आणि सूज्ञ यात फक्त रहस्य अनाकलनीय आहे हे समजण्याचा फरक असतो, कारण मी जरी तुम्हाला तुम्हीच सत्य आहत असं कितीदा जरी म्हणालो तरी ते मंजूर करणं तुमच्यावर असतं! ज्या क्षणी आपणच ते सत्य (किंवा रहस्य) आहोत हे तुमच्या लक्षात येतं तेंव्हा तुम्ही त्या रहस्यात बुडून जाता, ज्ञानी होता!

२) दादा, फंडामेंटल एकच आहे आणि मी ते पहिल्या लेखाच्या पहिल्या वाक्यातच सांगीतलं आहे! जीवनात आता मी आवश्यकतेनी जगत नाही, मजा म्हणून जगतो, मनमुराद जगतो, इथे लिहीणं माझा छंद आहे.

माझं कौशल्य सत्य समजण्यापेक्षा ते जीवनाच्या विवीध अंगाना भिडवण्यात आहे. मी:  बायको, लग्न, युद्ध, संगीत, विज्ञान, खेळ, स्टोरी रायटींग, कविता, चित्रकला, विनोद, दारु काय वाट्टेल तिथे माझा बोध नेऊ शकतो आणि मजा आणू शकतो. माझे एकसोएक मित्र आहेत. एकहार्ट आणि मी यात बहुदा हाच फरक आहे. मला मजा येतेय, तू ही जमव!

संजय