जे शब्द संस्कृतमध्य इनंत आहेत त्यांच्यापासूनच फक्त ईकारान्त विशेषण बनते. योगी, भोगी, स्वामी, कर्मी ही नामे आणि विशेषणे अनुक्रमे योगिन्, भोगिन्, स्वामिन्, कर्मिन् या इनंत शब्दांची आहेत. अभंगिन् असा शब्द नाही, त्यामुळे अभंगी असे विशेषण किंवा नामही होणार नाही.  होत असते तर प्रेमभंग झालेल्याला प्रेमभंगी म्हणता आले असते.