प्रदीपजीः
आपल्या बाळबोध शंकाचे निरासन मी कर्तोय.
- धन्यवाद.

पण हे शेवटचे.
- चालेल. मीही पुन्हा तशी वेळ आणणार नाही तुमच्यावर.

तुम्ही फार आणि अनावश्यक बोलता, वाचायला खूपच कंटाळा येतो.
- याबद्दलही धन्यवाद. तुम्हाला कंटाळा आल्याबद्दल क्षमा चाहतो.
 
तुम्ही कोण? ह्या प्रश्नाचे उत्तर मी प्रश्नाने देउ शकतो, पण जाउ दे.
- हाच प्रश्न मला विचारून तुम्ही या प्रश्नाचे उत्तर मला दिले असते, याची मला खात्री आहे. पण तुम्ही जाऊ दिलेत म्हणून आता मीही जाऊ देतो!

मराठी-उर्दू गझलेच्या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मी अत्यंत श्रम घेतलेत, आणि महत्ताचे म्हण्जे माझ्या पदरचे हजारो रुपये वेचले आहेत. मी स्प्ष्टपणे मान्य कर्तो यात माझा स्वार्थ होता. माझ्या नावावर कविता-गझलांचे एक पुस्तक आहे, हौस नावाचे, जे आपण जरूर वाचावेत. मला वाटते एव्हढे पुरेसे असावे.
- तुमचे हे 'कर्तृत्व' मला ठाऊक आहे. माझा रोख तुमच्या 'कर्तृत्वा'ला उद्देशून नव्हताच मुळी. तुमच्या प्रतिसादातून जो  'मी' आणि 'मला' डोकावत होता, त्याला उद्देशून माझा हा प्रश्न होता. असो.

कलेचा विषय चालू असताना कलाकाराने आपले सामान्यत्व बाजूला ठेवायला हवे.
- फार ढोबळ बोलताय तुम्ही. सामान्यत्व आणि असामान्यत्व असे सोईनुसार आणि प्रसंगानुसार बाजूला काढून ठेवता येत नसते.

काय सांगू? ह्या गोष्टीची खंत मला अद्याप आहे.
- हे उत्तर मला कळले नाही. त्यामुळे हा प्रश्न मी 'जाऊ देतो'.

आपण फार बाळबोध बोलताय. चांगलं-वाईट सगळे रिलेटिव्ह असते.
- माझ्या 'सापेक्ष बाळबोध बुद्धी'ला चांगले ते चांगलेच जाणवते आणि वाईट ते वाईटच जाणवते.

मधले २ परिच्छेद सोडत आहे, कंटाळा आलाय.
- बरे झाले! उत्तरे देण्याचे माझेही श्रम वाचले.

पहीले वाक्य मान्य.
- धन्यवाद.

दुसरे वाक्य आपण भटचाहत्यांना जरूर ऐकवावे, ज्यानी खावर-इलाहींवर असेच शिंतोडे उडवले होते.  
- भट यांचे चाहते असे एक-दोन नाहीत. आख्ख्या महाराष्ट्रात आणि (कदाचित महाराष्ट्राबाहेरही) हा वर्ग पसरलेला आहे. ज्यांनी वरील दोघांवर शिंतोडे उडवलेले असतील, त्यांना हे वाक्य तुम्ही ऐकवलेत तरी चालेल. कारण भटसाहेबांच्या कोणत्या चाहत्यांनी या दोघांवर शिंतोडे उडवले आहेत, याची मला कल्पना नाही.

हे वाक्य खरेतर भटांनाही ऐकावयाला हवे होते.
- हो ना. तुम्हाला आत्तासारखी गझलेची आणि एकंदरच गझल-क्षेत्रातील घडामोडींची 'जाण' भटसाहेब हयात असतानाच्या काळात असती तर किती बरे झाले असते!

तसेही मी भटांवर शिंतोडे उडवले असे मला वाटत नाही.
- 'तसेही' या शब्दातच सारे काही आले. पण यासंदर्भात मी एकंदरीतच 'बुजुर्ग' हा शब्द वापरलेला आहे. तुमच्या मनात 'भटसाहेबांचेच चांदणे' का पडले,  कुणास ठाऊक!

आपल्यासाठी इतकेच.
- माझ्यासाठी इतके का होईना लिहिलेत, त्याबद्दल मनापासून आभार.

* * *
धोंडोपंतांना तुम्ही दिलेल्या उत्तरात माझ्या नावाचा उल्लेख आहे, म्हणून त्या उत्तराची 'खबर' मीही घेत आहे.

हे मला आपल्या (धोंडोपंतांच्या) प्रतिसादावरून लक्षात आले. लय कशी साफ गडबडली हे आपण प्रदीपजींना विचारावे, ते व्यवस्थित सांगतील.

- इथे तुम्ही ज्या शेरातील दुसऱया ओळीत लय साफ गडबडली आहे, असे म्हटलेले आहे, तो शेर असा :

शेवटी राहिले, घर सुनेच्या सुने
उंबऱ्यावरच मी, तणतणत राहिलो

तुमच्या मताशी मी इथे सहमत नाही. इथे लयीचा प्रश्न येतो तो केवळ 'उंबऱयावरच मी' या शब्दसमूहापुरता... आपण ओळ कशा पद्धतीने उच्चारतो, त्यावरही अनेकदा लय अवलंबून असते.
इथे 'उंबऱया'नंतर किंचित विश्राम घ्यावा आणि मग पुन्हा 'वरच' हा शब्द सलग उच्चारावा. लय मुळीचच गडबडली नसल्याचा अनुभव येईल.  
ऱहस्व अक्षरांचा जास्तीत जास्त वापर केल्यामुळे शेर (किंचित) सैल होतात, असे वाटत नाही. उच्चारणपद्धतीवर ते अवलंबून असते.

* * *
तुला सांगून ही कळणार नव्हते
घसा मी कोरडा केला उगाचच

- हे ब्येस झालं...!  

पण घसा कोरडा करण्याआधी हे कळले असते तर किती बरे झाले असते बरे!
माझी प्रदीर्घ उत्तरे वाचून तुम्हाला कंटाळाही आला नसता आणि तुम्हाला कंटाळा आणणारे 'बाळबोध' असे काहीतरी 'अनावश्यक'  मलाही लिहावे लागले नसते!

धन्यवाद.

 
खुळी चर्चा कधी उकळायची, उकडायची नाही!
मलाही वाफ तोंडाची पुन्हा दवडायची नाही!

* * *
जाता जाता : तुमच्या उपरोल्लेखित शेरातील पहिल्या ओळीत सांगूनही मधील ही जोडून हवा हं. तोडून नको. कारण इथे 'ही' हे अक्षर 'सुद्धा', 'देखील' या शब्दांसाठी आलेले आहे आणि या शब्दांसाठी 'ही' हे अक्षर ज्या ज्या वेळी एखाद्या शब्दापुढे येते, त्या त्या वेळी ते जोडून येते. )