इंग्रज किंवा अमेरिकन जसं इंग्रजी बोलू शकतात तसं इतर कोणीही बोलूच शकणार नाही
असा न्यूनगंड नसावा. मुळात अमेरिकन उच्‍चार आणि इंग्रजांचे उच्‍चार  अ‍ेकसारखे नाहीत. इंग्‍लंडमध्येदेखील लंडन शहराच्या दक्षिण भागात असलेल्या शाळा-कॉलेजांच्या परिसरात ऐकू येणारे इंग्रजी उच्‍चार प्रमाण समजले जातात.  लंडनच्या अन्य भागात आणि उर्वरित इंग्‍लंडमध्ये ऐकू येणारे उच्‍चार भिन्‍न असू शकतात.  थोडाश्या सवयीने कुणाच्याही उच्‍चारांचे अनुकरण करता येते.  मात्र ते करावे का नाही हा वेगळा मुद्दा आहे.
मराठी माणसाने आपले मराठी इंग्रजी बोलावे, अमेरिकनाने अमेरिकन.