अवेअरनेस नि ताण वाढत जातो कारण अवेअरनेस कशाचा तरी असतो, रिलॅक्स्ड मूड हवा, आपणच तर सत्य आहोत काय शोधायच आणि कसला अवेअरनेस?. चला या विषयी एक स्टोरी सांगतो.
माझा एक मित्र नेहेमी कन्फ्यूज्ड असायचा तो ओशोंच्या एका ख्यातनाम साधकाचं मार्गदर्शन घेत होता आणि त्यांनी सांगीतलं होतं की कायम अवेअरनेस हवा. जेव्हा तो माझ्याकडे यायचा त्यावेळी मी गाणी वाजवत बसलेलो असायचो नाहीतर झोपलेलो असयचो, तो आला की मी भटकायला जायला तयार. त्याला मी म्हटलं अरे तू फक्त अवेअरनेसच्या एवजी रिलॅक्सेशन असं लक्षात ठेव तू बिंधास्त होशिल पण त्याला काही ते पटायचं नाही कारण मी अध्यात्मात आगदीच नवखा आणि त्याचे गुरू म्हणजे अत्यंत नांवलौकीक असलेलं प्रस्थ. एकदा मी त्याला म्हणालो चल मी येतो तुझ्या बरोबर तुमच्या सत्संगाला तर तो राजी होईना कारण तो गुरुंच्या मर्जीतला होता आणि त्याला उगाच अनावस्था प्रसंग ओढवेल असं वाटत होतं. मी त्याला म्हणालो की अरे मी पूर्णपणे गप्प राहीन मग तो राजी झाला आणि आम्ही गेलो. त्या दिवशी नेमका एकच प्रश्न घेतला गेला आणि तो ही याचाच त्यामुळे गुरुजीना (खरं तर त्यांना 'सर' म्हणायला हवं) फुल ग्राउंड मोकळं होतं. आता या पठ्यानी लेखीस्वरूपात नेमका प्रश्न त्यांच्या पुढे ठेवला, तो असाः 'इतके दिवस साधना करून देखील टेंशन कमी होत नाही, साधना कमी पडते किंवा काय मार्गदर्शन करावे! '
सरांनी जवळ जवळ चाळीस मिनीटं बॅटींग केली पण उत्तर सापडेना शेवटी त्यांनाच टेंशन यायला लागलं, मी शब्द दिल्या प्रमाणे नुसता बघत होतो की आता तरी जमेल मग तरी जमेल पण नाही, शेवटी त्यांनी आवरतं घेतलं. मग आम्ही खाली आलो ते निघून गेल्यावर मी मित्राकडे बघीतलं तो म्हणाला ठीक आहे त्यांना नाही जमलं तू सांगू शकतोस का? मी म्हणालो 'आयला त्यात काय विषेश आहे? साधना हेच तर टेंशन आहे तुम्ही साधना सोडा झालात रिलॅक्स! स्वतःला शोधायला प्रयत्न कशाला हवा! तो म्हणाला "चल वैशालीत कॉफी घेऊ मी गुरू सोडून दिलाय".
या शिवाय माझा 'सजगता' हा लेख ही उपयोगी ठरेल.
संजय