कथानकातील नात्यांचे तिढे उलगडतांना कथानकाचा वेग जराही कमी झाला नाहीं वा कथानकाची पकडही ढिली पडली नाहीं. इतकीं पात्रें असूनही वाचतांना पात्रविषयक गोंधळ उडत नाहीं. सर्वच व्यक्तिरेखा कथानकांत चपखल बसल्या आहेत. ओळख हें शीर्षकही जमलें आहे. या संकल्पनेवर अनेक कथा मराठींत आलेल्या आहेत. तरी नाविन्यपूर्ण, दर्जेदार असें कांहीतरी वाचल्याचा आनंद मिळाला.

वा! झकास. धन्यवाद.

साबणमालिका शब्द आवडला. चित्रवाणीवरील लोकांना सकस लेखनाचें वावडँ आहे. कारण मग कथेचें मानधन ठराविक वर्तुळाबाहेरील लोकांना आणि पात्र लेखकांनाच मिळेल ना. मराठींत इतकें विपुल लेखन असूनही किरकोळ अपवाद वगळतां सध्यां तरी साबणमालिकांत या साहित्याचा वापर होत नाहीं. असो.

सुधीर कांदळकर