मी एका इंग्रजी बोला (स्पोकन इंग्लिश .... ) च्या कार्यशाळेला गेलो होतो. तिथे एका वक्त्याने सांगितले की कोणता उच्चार कसा करतात आणी दंत, तालव्य, वगैरे प्रकारसुद्धा शिकवले. त्यांनी त्यावरून सांगितले की काही उच्चार असे असतात की ते मूळ रहिवासीच (नेटिव्ह स्पीकर) करू शकतात, त्यामुळे १००% कोणी अमेरिकन वा ब्रिटिश इंग्रजी बोलू शकणार नाही. त्यासाठी त्यांनी काही शास्त्रीय कारणे सुद्धा दिली होती पण आता आठवत नाही. कदाचित गुगलबाबा सांगू शकतील. मात्र कोणतीही भाषा तिच्या मूळ स्वरूपात बोलणे चांगलेच असते, पण काही कारणाने ते शक्य नसल्याने त्यास मिळती जुळती उच्चार करावे, असं त्यांचं म्हणणं होतं. असो.

मराठी माणसाने आपले मराठी इंग्रजी बोलावे,  अमेरिकनाने अमेरिकन. हे १०० % मान्य.

बाकी कोणती मराठी प्रमाण मानावी याचे मापदंड चुकीचे आहेत की काय, ही वेगळी चर्चा होऊ शकेल