तुम्ही हार्मोनियम मध्ये माहीर दिसता. तुम्ही संगीता विषयी (विशेषतः वादन) काही लिहीले तर ते वाचनीय होईल आणि मला तर निश्चीत उपयोगी होईल. स्वतंत्र लेख लिहावा किंवा व्य. नि. पाठवावा अशी फर्माईश करतो आणि वाटल्यास माझ्या संगीत या लेखावर तुम्हाला  कालरहीततेवर वर काही सांगायचे असेल तर जरूर लिहावे.

मध्यंतरी फिल्म फेस्टीवल साठी सुभाष घई आले होते त्यांनी त्यांच्या सांगीतीक आकलनाची संपूर्ण स्लाईड करून आणली होती आणि संगीताचं दृश्यरूप यावर ते भन्नाट बोलले. त्यांचं असं म्हणणं होतं (स्लाईड मधे) की शांतता हा संगीताचा अविभाज्य घटक आहे पण त्यांच्या बोलण्यात हा मुद्दा आला नाही. प्रश्नोतरांच्या वेळी मी त्यांना म्हणालो की संगीत आणि शांतता यांच काय परस्पर नातं आहे? तर ते एका वाक्यात म्हणाले की: 'शांतता हा संगीताचा परमोच्य बिंदू आहे! ' (सायलेंस इज दी क्लायमॅक्स ऑफ म्युझीक)!

 धन्यवाद!

संजय