श्री‌. शुद्ध मराठीजी. संस्कृतोद्भव शद्बांपासून बनणाऱ्या विशेषणांबाबत आपण दिलेली माहिती बोधप्रद आहे. आभारी आहे. मराठी शब्दकोशात 'अभंग' हा शब्द, 'संस्कृत विशेषण' असे स्पष्टीकरण देऊन त्याचा अर्थ 'भंग न पावणारा' असा दिला आहे. पुढे 'अभंगी' हा शब्द 'प्राकृत' असे स्पष्टीकरण देऊन जर ते नाम असेल तर 'अयोग्य रीत (ज्ञा.१८/२८०)' आणि विशेषण असेल तर  'अविनाशी' असा अर्थ दाखविलेला आहे. असो. प्रस्तुत ठिकाणी 'अभंग' हा शब्द प्राकृत असल्याने (त्याला संस्कृतचे नियम न लावता)  त्याचे 'अभंगी' हे विशेषण/नाम म्हणून वापरणे चुकीचे ठरणार नाही, असे माझे मत आहे. चू. भू. दे. घे.