जिजाजी हा शब्द आठवला पण तो मूळ मराठी नाही, जरी सद्ध्या मराठीत चांगलाच रुळला असला तरी.

ताटातूट हा शब्द इंग्लिशमध्ये लिहिताना केवळ टी हे एकच व्यंजन वापरावे लागेल. 

कोऽकोऽको असे ध्वनिवाचक शब्द. सासूसी असा जुन्या काव्यातला अशुद्ध शब्द‌. सासूशीं ऐवजी वापरलेला. ददाद हाही क्वचित ठिकाणी ददात ऐवजी वापरलेला.(सुपुर्द/सुपूर्त प्रमाणे.)  बिब्बा हा अडीज अक्षरी शब्द. मंमम/मम्मम् (छोट्या बाळाचे जेवण.) हाही असाच मोडका तोडका शब्द. चंचीचा/चे/ची, चोचीचा/चे/ची ,चिंचेचे/चा/ची., चाचेच, (समुद्री चाचे) इ. शिसी किंवा शिशी हा शब्द मानला तर शिशीशी हा विभक्तिप्रत्ययाने बनू शकेल. लहान मुलांच्या संबंधी वापरात असलेले शीशी/सूसू  हेही शब्द शी /स प्रत्ययाने तीन अक्षरी बनू शकतात. तसेच शशी बाबतही. लीलेला, लालूला, लालाला(लाला नावाच्या माणसाला.) ललीला,लालीला. पॉपप हे इंग्लिश पॉप अप चं लघुरूप जालीय भाषेत रुळू पाहातंय.